( मामू ) Mamu : Class 11th Marathi Swadhyay All Questions and Answers : Marathi Excercise Yuvakbharti Maharashtra State Board

Class 11th Marathi : 1st Chapter Mamu - मामू  [ इयत्ता - 11 वि ]

मामू -  प्रश्न उत्तरे
स्वाध्याय

प्रश्न 1 -
अ ) कोण ते लिहा 

1- चैतन्याचे छोटे कोंब  
शाळेतील लहान मुले 

2- सफेद दाढीतील केसा एवढ्या आठवणी असणारा 
- मामू 

3- शाळेबाहेरचा बहुरूपी 
- मामू 

4- चहूवाटांनी पांगणारा 
- इमानदार चाकरवर्ग 

5- मामूचा मुलगा 
- शाबू 

6- अल्लाला प्यारी झालेली 
-मामूची आई 

7- जुन्या काळातील भारी शिक्षक 
- एम.आर.सर 

8- शिवाजी सावंत यांच्या हाताखाली शिकला 
- शाबू 

9- अनघड,  कोवळे कंठ 
- शाळेतील लहान मुले 

आ) कृती करा :

1- लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह 

उत्तर : 1) चैतन्याचे छोटे छोटे कोंब 
2) अनघड कोवळे कंठ 
3) रांगा धरून उभे राहिलेले 
4) मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञान शक्तीला आवळणारे


समोर दिलेली कृती पूर्ण करा 

मामूची शाळाबाह्या रूपे - 
1 - मौलवी 
2 - व्यापारी 
3 - उस्ताद 

गृह प्रवेशाच्या वेळी मामूच्या घरी आलेले प्रमुख पाहुणे -
1) आमदार 
2) खासदार 
3) बडे व्यापारी 
4) प्राध्यापक 
5) शिक्षक 

परीक्षा केंद्रावरील महत्वाची कामे -
1) बाकावर क्रमांक टाकणे 
2) बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणे 
3) शाळेची घंटा वाजवणे 
4) परीक्षार्थ्यांना पाणी देणे   

मामूचा पोशाख -
1) डोक्यावर अबोली रंगाचा फेटा 
2) नेहरू शर्टावर गर्द निळं जाकीट 
3) चांदीच्या साखळीच जून पाकीट वॉच 
4) खाली घेराची आणि घोट्याजवळ चुण्या असलेली तुमान 
5) पायात जुना पुराना पंपषु 

शाळेत परीक्षा केंद्रे आहे-
1) ड्रॉईंग सर्टिफिकेट चे परीक्षा केंद्र आहे 
2) कॉमर्स सर्टिफिकेट चे परीक्षा केंद्र 

खेळताना मुलगा पडला तर मामू करत असे -
1) रिक्षा आणणे 
2) डॉक्टरकडे घेऊन जाणे 
3) मायेचा आधार देणे 
4) त्या मुलाची प्रेमाने विचारपूस करणे 

खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा 

1) मामू सावधानाचा पवित्रा घेऊन खडा होता 
- देशभक्ती 

2) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते. 
- मातृप्रेम, भावनाशीलता 

3) काय पवार सर,  काय ही तब्बेत? 
- आपुलकी,  जिव्हाळा 

4) मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, 
" घाबरू नकोस ताठ बस काय झालं न्हायी तुला "
- वात्सल्य 

5) मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर दहा-वीस मीनिटे बोलू शकतो
- अभ्यासू वृत्ती, ज्ञानी वृत्ती 

खालील शब्द समूहांचा अर्थ लिहा 

1) थोराड घंटा - 
दणकट,  बळकट, मोठी वजनदार घंटा 

2) अभिमानाची झालर -
झालरी मुले शोभा वाढते,  मामूच्या चेहऱ्यावर देशप्रेम, अभिमानाचा भाव होता आणि त्याच भावाला झालरीची उपमा दिली आहे.  

खालील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तैयार करा 

1) इशारतीबरहुकूम 
: 1- इशारती 
2-रती 
3-बहू
4-हुकूम
5-तिर 
6-मर 
7-मती 

2) आमदारसाहेब 
: 1 - आमदार 
2- साहेब 
3- दार 
4- दाब 
5- आबा 
6- मर 
7- दाम 
8- सार 
9 - मदार 

3) समाधान 
: 1- मान 
2- सन 
3- समान 
4- धान 
5- समास 
6- मास 
7 - नस